जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी आणखी हिंसाचार घडण्याची शक्यता 

ट्रम्प समर्थकांकडून वाॅशिंग्टन डीसीबरोबर अन्य ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन करण्याची शक्यता

0

वाॅशिंग्टन ः अमेरिकेतील कॅपिटाॅल इमारतीमध्ये ट्रम्प समर्थकांनी चांगलाच गोंधळ घातला, त्यात काही आंदोलक मृत्यूमुखी पडले. अशा पार्श्वभूमीवर आणखी महत्वाची माहिती समोर येत आहे. एफबीआयने यासंबंधीचा इशारा दिलेला आहे की, जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी ट्रम्प समर्थकांकडून वाॅशिंग्टन डीसीबरोबर अन्य ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन करण्याची शक्यता आहे, असे वृत्त राॅयटर्सच्या सूत्रांनी दिलेले आहे.

या पार्श्वभूमीवर वाॅशिंग्टनच्या सुरक्षेसाठी सुमारे १५ हजार तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. तसेच २४ जानेवारीपर्यंत वाॅशिंग्टन स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकानांही बंदी घालण्यात आली आहे. एफबीआयने १६ ते २० जानेवारी या कालावधीत हे हिंसक आंदोलनाची शक्यता व्यक्त आहे, तसेच पुढील ३ दिवसांसाठी इशारा कायम आहे.

“शनिवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये जवळपास १० हजार तुकड्या उपस्थित असतील. सुरक्षा, लॉजिस्टिक अशा गोष्टींसाठी मदत करण्यावर त्यांचा भर असेल. जर स्थानिक प्रशासनाने मागणी केली तर ही संख्या १५ हजारांपर्यंतही जाऊ शकते”, अशी माहिती नॅशनल गार्ड ब्यूरोचे प्रमुख जनरल डॅनियल यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.