मंगळवारी ( दि .2 मार्च ) मध्यरात्री बारापासून रात्री बारापर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू असणार आहेत . या कालावधीत नागरिकांनी परिसरात येऊ नये , तसेच मंदिर परिसरातील दुकानदार , हातगाडी , स्टॉलधारक यांनी आपले स्टॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
अंगारकी चतुर्थीच्या निमित्त मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक भक्त येतात . यामुळे गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत . पडवळआळी , सुखकर्ता अपार्टमेंट चौक , जिजाऊ पर्यटन केंद्र , फकीराभाई पानसरे उर्दू शाळा चौक , मंगलमूर्ती वाडा परिसर , चिंतामणी गणेश मंदिर , मोरया यात्री निवास , मोरया प्रसाद हॉल समोरील रोड.श्री मोरया गोसावी समाधी मंदिर चिंचवडगाव परिसरात जमावबंदी व संचारबंदी लागू राहणार आहे.
देवस्थानच्या लोकांना या परिसरात प्रवेश असेल. मात्र , त्यांनी देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आलेले ओळखपत्र सोबत बाळगावे , असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे .