पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

0

सोलापूर : जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष पाजल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोन मुलांना विष पाजून आईने स्व:ताचीही जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या पेनूर येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

प्रियांका चवरे असं महिलेचे नाव असून सात वर्षाच्या (मुलगी) सुप्रियाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. घरगुती वादातून प्रियांका चवरे या महिलेने आपल्या 7 वर्षाच्या मुलीसह 4 वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजले आहे. यानंतर प्रियंका चवरे या महिलने स्वतः टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेत 7 महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर 4 वर्षांच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये घरगुती वाद सुरू होते. याच वादामुळे प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जातेय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.