पुणे : धारदार कोयत्याने वार करून 17 वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. हा प्रकार दत्तवाडी भागात रविवारी रात्री घडला आहे.
सौरभ तानाजी वाघमारे (वय 17) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, रविवारी रात्री 9 नंतर पर्वती पायथा परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सौरभ याला गाठले. त्यानंतर त्याच्यावर सपासप वारकरून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर हे टोळके घटनास्थळावरून पसार झाले.
खुनाची घटना कळताच दत्तवाडी पोलिसांनी धाव घेतली. पूर्वीचे वाद आणि गुन्हेगारीतील खुन्नस यावरून खून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.