पैशाच्या वादातून तरुणाचा खून

0
अहमदनगर : राहता तालुक्यातील शिर्डी जवळील डोऱ्हाळे गावात पैशाच्या वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहता तालुक्यातील शिर्डी जवळील डोऱ्हाळे गावात शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास योगेश सोपान दवंगे 28 रा. सिन्नर आणि फिर्यादी प्रवीण महादेव धारे या दोघांना शिवा राहणे यांच्याकडून पैसे घेतल्याच्या कारणावरून आरोपी चांगदेव पूजा डांगे, शंकर चांगदेव डांगे, अमोल चांगदेव डांगे या तिघांनी प्रवीण आणि योगेश यांना शिवीगाळ करून धारदार हत्याराने वार केले.
या तिघांनीही योगेश दवंगे यास गंभीर जखमी करून निर्घृण खून केला आहे. दरम्यान, सदरील घटनेमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली असून शिर्डी पोलीस प्रवीण महादेव धारे यांच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.