मुंबई : आंतरारष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले मराठमोळे संगीतकार नरेंद्र भिडे यांचं आज 10 डिसेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते 47 वर्षांचे होते. त्यांचं अंत्यदर्शन सकाळी 9 वाजून 30 मिनिटाला डॉन स्टुडिओ येथे ठेवण्यात येणार आहे. तर 11 वाजता वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आपल्या संगीतातून शास्त्रीय व आधुनिक बाजाच्या सुरांची गुंफण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी कौशल्या दाखवलं.
अवंतिका, ऊन पाऊस, कितीतरी दिवसांनी आज, त्या पैलतिरावर मिळेल मजला, नुपूर, श्रावणसरी ही त्यांची आठवणीतील गाणी गाजली. तर देऊळबंद, पुष्पक विमान, चि सौ कां, अनुमती, पाऊलवाट आणि रानभूल या चित्रपत्रांना त्यांनी संगीतबद्ध केलं होतं.
मनाप्रमाणे काम केल्यास ते लोकांपर्यंत पोहोचते, असं नरेंद्र भिडे कायम म्हणत असत. तुम्ही स्वतःच्या मनाप्रमाणे काम कराल, तेवढं ते अधिक लोकांपर्यत पोहोचेल. तर लोकांच्या कलानं घ्याल, तेवढं त्यांच्यापासून दूर जाताल, असंही संगीतकार नरेंद्र भिडे यांनी सांगितलं होतं.