नागपूर : सन १९९३ मध्ये मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये मुंबईकरांचे चिथडे उडाले. ज्यांनी या बॉम्बस्फोटासाठी रेकी केली आणि आरडीएक्स गाडीत भरले, त्या सरदार शहाव अली खान आणि मो. सलीम ईशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याशी अल्संख्यांक मंत्री नवाब मलिकांचे थेट संबंध आहेत. कुर्ल्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात तेव्हा मंत्री असताना मलिक गुंतलेले होते, असा बॉम्ब विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे फोडला.
फडणवीस म्हणाले, कुर्ल्यासारख्या अशा पाच संपत्तीसाठी मलिकांनी अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत व्यवहार केले. ज्यांपैकी ४ संपत्तीमध्ये अडरवर्ल्डचा ॲंगल पक्का आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. २००५ पर्यंतच्या या संपत्ती आहेत. हे पुरावे मी देणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हे पुरावे पाठवणार आहे. जेणेकरून त्यांनाही माहिती व्हावे, की त्यांच्या मंत्र्यांनी काय काय दिवे लावले आहेत. मायमराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद मातृभाषेऐवजी राष्ट्रीय भाषेतून फडणवीसांनी सुरू केली. ते म्हणाले, एक घोषणा केली होती, दिवाळीनंतर तुमच्यासमोर काही विषय आणणार. थोडा वेळ लागला पण आज मलिकांच्या विरोधातील पुरावेच मी देणार आहे.
मी जे सांगणार आहे. ती सलीम जावेदची स्टोरी नाही आणि इंटरवलच्या नंतरचा सिनेमाही नाही. ही फार गंभीर बाब आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा विषय आहे. दोघांपैकी एक सरदार शहाव अली खान १९९३ बॉम्ब ब्लास्टचे गुन्हेगार जे आता जेलमध्ये आहेत. हा सरदार शहाव अली खानवर आरोप होता की टायगर मेमनसोबत फायरींगमध्ये त्याचा सहभाग होता. मुंबई स्टॉक एस्सजेंजमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा, यासाठी रेकी सरदार खानने केली होती. स्फोटाच्या कारस्थानीची माहिती त्यांना होती. गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे खान होते. यामध्ये जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत किंवा ज्यांनी सरकारी साक्षीदार म्हणून काम केले. त्यांच्या सर्व बयाणांची पुष्टी केल्यावर या आरोपीला आजीवन कारावास ठोठावण्यात आलेचे फडणवीस म्हणाले.
या प्रकरणातील दुसरे व्यक्ती मो. सलीम ईशाक पटेल उर्फ सलीम पटेल. सलीम हसीना पारकरचे चालक होते. बॉडीगार्ड आणि फ्रन्टमॅन होते. हसीना पारकर यांना अटक झाली, तेव्हा सलीमलाही अटक झाली. मुंबई पोलीसांचे रेकॉर्ड चेक केले तर दाऊदच्या फरारी झाल्यानंतर हसीना आपाच्या नावाने संपत्ती जमा होत होत्या. जमा करणारा सलीम पटेल होता. याच्या नावाने पावर ऑफ अर्टर्नी होती. सलीम पटेल, सर्व व्यवसायात पारकरचा हा प्रमुख होता. यांचा संबंध म्हणजे कुर्लामध्ये ३ एकर जागा. २.८० एकर १,२३,००० स्वेअर फुट जागा. गोवावाला कम्पाऊंडमध्ये गोवावलांची जागा होती.
एलबीस रोडवर ही जागा आहे. हा अत्यंत महागडा परिसर आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलीडस इन्वेस्टमेंट कंपनीच्या नावे झाली. हा व्यवहार मरीयमबाई गोवावाला यांच्यासोबत झाला आणि मुदीरा प्लंबर पावर ऑफ अर्टर्नी होल्डर आहे. सलीम पटेल आणि विक्री करणारे सरदार शहाब अली खान यांनी मिळून या जमिनीची विक्री केली. घेणाऱ्याची सही फरहाज मलिक यांची आहे. नवाब मलिक तेव्हा मंत्री होते. पण नंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीमाना दिला होता. फरहाज मलिकने जमीन खरेदी केली होती. त्यावेळी भाव होता २०५३ रुपये प्रती चौरस फुट. ८५५० रुपये रेडीरेकनर आणि २०५३ रुपये मार्केट रेट होता. अंडरवर्ल्डच्या लोकांकडून खरेदी केलेली जमीन केवळ २५-३० लाख रुपयांत खरेदी केली गेली अन् त्याचे पेमेंट २० लाख रुपयांचे झाले. रजिस्ट्रीच्या पान क्रमांक ५ वर या नोदी आहे, असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे सर्व पुरावे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, संबंधित तपास यंत्रणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार असल्याचेही ते म्हणाले.