‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’ : चंद्रकांत पाटील

0

सोलापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.

महागाई भत्त्याबरोबरच काही मागण्या मान्य झाल्याने एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. मात्र कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. कृती समिती शासनासोबत डील करतं असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सहकारमंत्री सुभाष देसाई पोहोचले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.