नीरज चोप्राने पटकावले रौप्य पदक

0

नवी दिल्ली : नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे नीरज चोप्राचे हे जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. यापूर्वी त्याने 2016 मध्ये ज्यूनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 90.54 मीटर भाला फेकला.

नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीची सुरूवात केली. मात्र त्याने पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. दुसरीकडे सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आणि गतविजेता अँडरसन पेटर्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 90.21 मीटर भालाफेक करत नीरज चोप्रासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर नीरजने 82.39 मीटर भाला फेकला. तो यादीत चौथ्या स्थानावर पोहचला.

मात्र ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकासाठी नीरज समोर अजून मोठे आव्हान ठेवले. पाचव्या स्थानावर घसरलेल्या नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकून आपली कामगिरी सुधारली. तो तिसऱ्या प्रयत्नानंतर तो पुन्हा चौथ्या क्रमांकावर आला.

Leave A Reply

Your email address will not be published.