वाॅशिंग्टन ः जगभरात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे, अशा परिस्थितीत पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेने फेसमास्क वापरण्यासंबंधिच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांमध्ये डब्ल्यूएचओने म्हटलंले आहे की, “१२ वर्षांच्या वरील वय असणाऱ्या मुलांसह सर्वांना मास्क घालावे.
दुकाने, कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये हवेचे क्लियरन्स खूपच खराब असते, अशावेळी मास्क वापरणे आवश्यक आहे. ज्या घरात हवेचे व्यवस्थापन नाही, तेथे मास्क वापरलाच पाहिजे. तसेच घरात आलेल्या पाहुणे आले तर, सदस्यांनी मास्कचा वापर करावा.
हवेचे व्यवस्थापन व्यवस्थीत आहे. मात्र, एक मीटरचे अंतर ठेवणे शक्य नाही अशा ठिकाणीही मास्क वापरणे महत्त्वाचे आहे. करोना रुग्णांची सेवा बजावणाऱ्यांनी एन-९५ मास्क वापरावा. त्याचबरोबर जास्त कष्टाचे काम करणाऱ्यांनी मास्कचा वापर करून नये, असाही सल्लाने जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.