भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा

0

इंदूर : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज  यांच्या आत्महत्येला तीन वर्ष होऊन गेलीत. त्यांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटमुळे हा खुलासा समोर आला आहे. भोपाळच्या फॉरन्सिक अधिकाऱ्याने 109 पानाचे व्हॉट्सअप चॅट न्यायालयासमोर सादर केले आहे. यावरुन या प्रकरणाची तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

जे व्हॉट्सअप चॅट न्यायालयासमोर सादर केले आहे त्यामधून पलक आणि पीयूष जीजू यांच्यातील संवादाचा उल्लेख दिसून येतो. त्यामध्ये मांत्रिकाचा देखील उल्लेख दिसून येतो. या व्हॉट्सअप चॅटमुळे सगळ्याच्यांच भुवया उडाल्या आहेत. दरम्यान, कथित आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर योग्य तपास करत नसल्याचा देखील आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पलकचा मोबाईल जप्त केला. यातील व्हॉट्सअप चॅट डेटा रिकवर करण्यात आला. पलकने पीयूष जीजूसोबत भय्यू महाराजांबद्दल बोलल्याचं आढळलं. यात भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि मुलगी कुहूचाही उल्लेख दिसुन येतोय.

दरम्यान, पलकनं भय्यू महाराजांचा अश्लिल व्हिडीओ बनवला होता. त्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. भय्यू महाराज यांनी आयुषीसोबत 2017 मध्ये लग्न केले होते. पलकने 1 वर्षाच्या आत लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. पलक 2 वर्षापासून भय्यू महाराजांच्या संपर्कात होती. तिला महाराजांशी लग्न करायचं होतं, पण भय्यू महाराजांनी डॉ. आयुषीसोबत लग्न केले.

चॅटमध्ये नेमकं काय आहे?
पलक : आयुषीने मांत्रिकाला पकडलं आहे त्याच्याशी 25 लाखांची डील झालीय

पीयूष जीजू : कोणाशी?

पलक : मांत्रिकाशी

पलक : BM ला वेडं ठरवून घरात बसवायचं आहे

पीयूष जीजू : कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूची रुम तयार होईल

पलक : कुहूने शरदला सांगितलं आहे. ती समोर आली तर तिला मारुन टाकेन

पलक : आयुषीने येऊन पुन्हा काम खराब केले

पलक : आयुषीने वहिनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकले

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी गोळी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणात विनायक आणि शरद नावाच्या 2 सहकाऱ्यांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पलकने भय्यू महाराजांचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता. त्या माध्यमातून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. पलक, विनायक आणि शरद हे तिघं महाराजांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत होते. भय्यू महाराज आणि पलक यांचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरु होते. त्यामुळे भय्यू महाराजांवर मानसिक दडपण आल्याचा आरोप आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.