शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. अजूनही देशात 2,88,394 लोक संक्रमित आहेत, जे संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 2.49 टक्के आहे, तर बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 96.12 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तसेेच 188 पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूमुळे मृत्यूची संख्याही 1,59,558 पर्यंत वाढली आहे.
आकडेवारीनुसार, 1,11,07,332 लोक संसर्गमुक्त झाले आहेत तर मृत्यूची संख्या 1.38 टक्के आहे. दरम्यान, दिलासादायक म्हणजे देशातील एकूण 4,20,63,392 लोकांना कोरोना विषाणूची लस देण्यात आली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाशी संबंधित कठोर नियमांची अंमलबजावणी करूनही, देशातील एकूण कोरोना प्रकरणांमध्ये महाराष्ट्राचा वाटा 69% आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील सर्वाधिक बाधित 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे राज्यातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, नांदेड आणि अमरावती आदींचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात 1,949 नवीन रूग्ण तर 8 जणांचा मृत्यू : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 1,949 नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 2,84,317 पर्यंत वाढली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे आणखी आठ मृत्यूंसह मृतांची संख्या 6,370 वर पोहेचली आहे. या जिल्ह्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत 2,64,590 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, रिकव्हरी रेट 93.06 टक्के आहे.
दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे की, 19 मार्च 2021 पर्यंत कोरोनाचे 23,24,31,517 नमुने तपासले गेले. त्यापैकी शुक्रवारी 10,60,971 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. ‘ महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला की लोकांनी नियम पाळावेत अन्यथा सरकारला सक्तीने लॉकडाउन लावावे लागेल. तसे, राज्यात काही ठिकाणी रात्रीचा कर्फ्यू आहे, तर काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास संपूर्ण लॉकडाउन होण्याची शक्यता आहे. माात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.