वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु

0

जम्मू : जम्मू काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात नव वर्षानिमित्त दर्शनासाठी उडालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन त्यात १२ भाविकांचा मृत्यु झाला असून २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

#UPDATE: 12 dead, 13 injured in the stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra. The incident occurred around 2:45 am, and as per initial reports, an argument broke out which resulted in people pushing each other, followed by stampede: J&K DGP Dilbagh Singh to ANI

(file photo) pic.twitter.com/EjiffBTMaJ

— ANI (@ANI) January 1, 2022

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही गर्दी इतकी वाढली की, त्यात ढकला ढकली सुरु झाली. त्यातून एकच गोंधळ वाढत केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा जागीच मृत्यु झाला.

तर २० जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत व बचाव कार्य सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर यात्रा स्थगित करण्यात आली असून मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.