ओमायक्रॉन : ‘ब्युटी पार्लर आणि जीम’च्या नियमावलीत बदल

0

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजे केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरुन अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधामध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.

जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश pic.twitter.com/E0VhZmFSqx

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 9, 2022

सुधारीत नवीन नियमावलीनुसार जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. 50 टक्के क्षमतेने जीम आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.नपण ही परवानगी देताना काही नवीन नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. यामध्ये जीम आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्यासह ग्राहकांनी लस घेणे गरजेचे आहे. या दोघांनी लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना परवानगी मिळणार असल्याचे नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिम बाबतचे आदेश
व्यायामशाळा (जीम) देखील क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. तसेच व्यायामशाळेत केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार असल्याचे सुधारित आदेशात म्हटले आहे.

सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यावसायिकांनी केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यावसायिकांची आज (रविवार) दुपारी ऑनलाइन बैठकही झाली होती. महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे बैठक आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र सलून अँड ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.