मिनी ‘लॉक डाऊन’च्या पहिल्या दिवशी ठिक-ठिकाणी वाहतूक कोंडी, प्रशासन आणि नागरिकांची तारांबळ

0

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज शनिवार पासून पुणे जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे सायंकाळी पाच नंतर रस्त्यावर घरी जाण्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी दिसत होते. प्रशासन आस्थापना बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आज मिनी लॉक डाऊनच्या पहिलाच दिवस असल्याने सर्वांची तारांबळ उडताना दिसत होती. अनेक चौकात वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे.

शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आले होते. त्याची आज पासून कडक अंमलबजावणी सुरु करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.

काय आहेत आज पासून सात दिवसांचे नियम…वाचा

1. सर्व रेस्टॉरंट आणि बार आगामी 7 दिवस बंद. होम डिलिव्हरी सुरू राहणार
2. मॉल आणि सिनेमा हॉल आगामी 7 दिवस बंद.
3. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे आणि पीएमपीएमल बस सेवा (अत्यावश्यक सेवा वगळून) आगामी 7 दिवस बंद.
4. आठवडे बाजार बंद असणार पण मंडई सुरू पण सोशल डिस्टेन्सिंग बाळगावी लागेल.
5. लग्न आणि अत्यंसंस्कार सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला (सभा, कार्यक्रम) परवानगी नाही.
6. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून 7 दिवस संचारबंदी लागू
7. हे सर्व निर्णय पुणे शहर आणि जिल्हयासाठी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.