गुरुवारी दिवसभरात ५० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0

मुंबई: राज्यात गुरुवारी ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ८८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३ हजारांपर्यंत खाली आली आहे. देशात आणि राज्यात करोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर दुसरीकडे करोनाचा ग्राफही खाली येऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील करोना साथ मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.

२४ तासांतील आकडेवारी लक्षात घेतल्यास करोना मृत्यूंचा आकडा पुन्हा वाढला आहे मात्र नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या आजही अधिक राहिली आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीच्या विळख्यात सापडून ५० हजार ९४४ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात सर्वाधिक ११ हजार ३३० करोनाबळी मुंबई शहरात गेले आहेत. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.५२ टक्के एवढा आहे. हा टक्का कमी करण्याचे आव्हान आजही आहे.

राज्यात आज २ हजार ८८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १९ लाख २३ हजार १८७ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त् यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४४ लाख ३० हजार २२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख १८ हजार ४१३ (१३.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १ लाख ९७ हजार ९४१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार ८०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या बरीच खाली आली आहे. राज्यात सध्या ४३ हजार ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक १३ हजार १४ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात ७ हजार ६८३ रुग्णांवर व मुंबईत ५ हजार ५२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.