मुंबई : राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रकही काढण्यात आले आहे.
यात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे.
त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांंचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करीत आहोत.