नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची पत्नी गृहिणी असेल तर नक्कीच तुम्ही तिच्या भविष्यासाठी विचार करत असाल. भविष्यात तुमच्या पत्नीने पैशासाठी कोणावरही अवलंबून राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
यासाठी पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडू शकता. एनपीएस खाते पत्नीला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच तिला दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळेल. एनपीएस खात्यात पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता. यामुळे, वयाच्या 60 नंतर तुमची पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही.
तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1,000 रुपयांमध्ये एनपीएस खाते उघडू शकता. एनपीएस खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असल्यास, पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत एनपीएस खाते चालू ठेवा.
उदाहरणार्थ, तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवता. जर तिला वार्षिक गुंतवणुकीवर 10 टक्के रिटर्न मिळत असेल तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून तिला सुमारे 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय तिला दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. ही पेन्शन तिला आयुष्यभर मिळत राहील.
वय – 30 वर्षे
गुंतवणुकीचा एकूण कालावधी – 30 वर्षे
मासिक योगदान – 5,000 रु
गुंतवणुकीवर अंदाजे रिटर्न – 10 टक्के
एकूण पेन्शन फंड –
– 1,11,98,471 रुपये मॅच्युरिटीवर काढता येतील.
– 44,79,388 एन्युटी योजना खरेदी करण्यासाठी रक्कम.
– 67,19,083 रु. अंदाजे एन्युटी रेट 8%
मासिक पेन्शन – 44,793 रु.
एनपीएस ही केंद्र सरकार ची सामाजिक सुरक्षा योजना आहे. तुम्ही या योजनेत गुंतवलेले पैसे प्रोफेशनल फंड मॅनेजरद्वारे मॅनेज केले जातात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर यांना ही जबाबदारी देते. अशा स्थितीत तुमची एनपीएसमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते.
मात्र, या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर रिटर्न मिळण्याची खात्री नाही. फायनान्शियल प्लानर्सच्या मते, एनपीएसने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.