ओडिसा रेल्वे अपघातात 200 हुन जास्त ठार तर 900 जखमी

0

ओडिसा : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकली.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या.

 

हेल्पलाइन नंबर…

आपत्कालीन नियंत्रण कक्ष: 6782262286
हावडा: ०३३-२६३८२२१७
खरगपूर: ८९७२०७३९२५, ९३३२३९२३३९
बालासोर: 8249591559, 7978418322
कोलकाता शालीमार: 9903370746

Leave A Reply

Your email address will not be published.