पी.व्ही. सिंधूने इतिहास रचला; भारताला 19 सुवर्णपदक

0

नवी दिल्ली : बॅडमिंटनमद्ये पी.व्ही. सिंधू हीने इतिहास रचला आहे. भारताने 19 व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.बॅडमिंटनमधील महीला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही.सिंधू हिचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी झाला. पीव्ही सिंधूने महिला एकेरीत कॅनडाच्या मिशल लीचा 21-15, 21-13 असा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले.

सिंधूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडी स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. पीव्ही सिंधूने पहिला गेम 21-15 अशा फरकाने जिंकत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुखापतीनंतरही सिंधू चांगली कामगिरी करत होती. दुसरा गेममध्ये सिंधूने मिशेलला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि त्याने 21-13 कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव केला. यासह भारताने न्यूझीलंडला मागे टाकत पदकतालिकेतील चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.