नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी नुकतीच सुत्रे हातात घेतली आहेत. पण, नवनियुक्त लष्करप्रमुखांनी जुन्या जनरलच्या पावलावर पाऊल ठेवत भारताविरुद्ध विष उगळायला सुरूवात केली आहे.
‘आम्ही आमच्या सीमांचे रक्षम करण्यास सज्ज असून, आपल्यावर हल्ला झाल्यास भारतासोबत युद्धासाठी आम्ही तयार आहोत.’ असे असीम मुनीर म्हणाले.
असीम मुनीर यांनी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. पाकिस्तानची सशस्त्र सेना त्यांच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. पण, आम्हाला डिवचले तर आम्ही लढायला तयार आहोत. असे असीम मुनीर म्हणाले. सीमावर्ती भागाच्या भेटीदरम्यान लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी लष्कराकडून नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची माहिती घेतली.
पाक लष्करप्रमुखांनी यावेळी सैनिकांसोबत धार्मिक घोषणाही दिल्या. लष्करप्रमुखांच्या भाषणाचा एका व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात पाकिस्तानी नकाशे अस्पष्ट दाखवण्यात आले आहेत.