पंकजा ताई घाबरु नकोस, मी तुझ्या सोबत आहे : धनंजय मुंडे

0
मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची यांनी प्रकृती बिघडली आहे. याची माहिती समजताच भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतरचे आपले अनुभव शेअर करत पंकजा यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मी तुझ्या सोबत आहे असेही म्हटले आहे.

‘मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे,’ अशी माहिती ट्विटरवरून पंकजा मुंडे यांनी दिली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोरोना विषाणूच्या त्रासाबाबत माहिती देत पंकजा यांना आवाहन केलं आहे की, ‘पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.’

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीदरम्यान पंकजा मुंडे यांच्या भूमिकेविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी आपण का सक्रीय नाही, याबाबतचा खुलासा करताना प्रकृतीविषयक माहिती दिली होती. ‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,’ असं आवाहन त्यांनी केलं होतं.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांना या विषाणूची लागण झाली होती. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.