ग्रामपंचायतींना ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी

0
मुंबई : कोरोनाचा उपाय योजना आणि सुरक्षा या संदर्भात जारी केलेल्या विविध मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास पुन्हा परवानगी मिळाली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरू करण्यास संमती देण्यात आली होती. पण काही दिवसांनी कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन (प्रकार) आढळल्याने दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

तथापि, ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक विकास आराखडे, सरकारच्या विविध योजनांतर्गत वैयक्तिक लाभार्थांची यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरुद्धातील अविश्वास प्रस्ताव, चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे इत्यादी बाबी प्रलंबित राहिलेल्या आहेत.

हे विचारात कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.