टोकियो : ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केला आहे. रवीकुमारला निर्दयीपणे कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याने चावा घेतल्याचे दिसून आले. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे
या सामन्यातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट टीमचा दादा म्हणजेच विरेंद्र सेहवाग यांनीही यावर प्रतिक्रियी दिली आहे. विरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रवीकुमारला कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव हा चावा घेत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे त्यानंतर रवीकुमारचा हात कसा दिसतो, ते दिसत आहे. हा फोटो शेअर करत, ‘हे किती अन्यायकारक आहे, आमच्या रवीकुमार दहियाच्या खेळभावनेला पराभूत करू शकला नाही, म्हणून त्याच्या हाताला चावा घेतला. कझाकिस्तानचा नुरीस्लॅम सनयेव हे लाजीरवाण आहे,’ असे कॅप्शन विरेंद्र सेहवाग यांनी दिले आहे.
आता रवीकुमारने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत प्रवेश झाला आहे. रवीकुमार हा दुसरा भारतीय आहे ज्याने ऑलिम्पिकच्या अंतिफ फेरीत प्रवेश केला आहे. या आधी सुशिल कुमार हा पहिला कुस्तीपटू होता ज्याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता रवीकुमारचा अंतिम सामन्यात रशियाच्या झौर उगुएवशी सामना होणार आहे.