काठमांडू : नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. यती एअरलाइन्सच्या या विमानात 5 भारतीयांसह 68 प्रवाशी व 4 क्रू सदस्य होते. ते राजधानी नेपाळहून पोखराला जात होते. पण पोखरा विमानतळावर उतरताना ते अचानक क्रॅश झाले.
प्रमुख जिल्हा अधिकारी टेक बहादुर के सी यांनी सांगितले की, आतापर्यंत 60 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यापूर्वी सरकारने या घटनेत 29 मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. तत्पूर्वी, प्रत्यक्षदर्शींनी या अपघातात कुणीही वाचले नसल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, घटनास्थळावरून 2 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. हे दोघेही मच्छिमार होते.
या अपघाताचे काही छायाचित्र व व्हिडिओ उजेडात आलेत. त्यात घटनास्थळावरील अत्यंत भयावह चित्र दिसून येत आहे. बचाव व मदत कार्य करणाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीच्या मते, लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर या विमानात आगीचे लोट दिसून आले. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे घडल्याचे म्हणता येत नाही. यापूर्वी या अपघातासाठी खराब हवामानाला जबाबदार धरले जात होते.