पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय मिळालेल्या माहितीवरुन पांढ-या रंगाची फोर्चुनर वाहन नंबर (एमएच १२, आरआर ९०००) ही गाडी पारगांव ते न्हावरा या रोडने जाणा-या ट्रॅक, टेम्पो या गाडीतील चालकास गाडी आडवी लावुन तुम्ही माझे गाडीला कट मारला त्यामुळे माझे गाडीचे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई म्हणुन आम्हाला ५००० रू दया असे सांगुन वाहनाचालकांना लुटण दरोडा टाकण्याचे तयारीमध्ये असल्याची व त्यात पाच आरोपी असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, रात्रगस्तीचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, मांडवगण चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील डी.बी. पथकातील अंमलदार पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस नाईक प्रफुल भगत, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण पिठले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत खुटेमाटे, प्रविण राउत, उमेश जायपत्रे, तुकाराम गोरे, संतोष साठे यांनी न्हावरे ते पारगाव रोडने सरकारी व खाजगी वाहनातुन रात्री १.२० च्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे फौर्चुनर गाडीचा आंधळगाव फाटा येथे शोध घेतला.या वेळी अंधारामध्ये एक संशयित वाहन तसेच वाहनाजवळ पाच ते सहा अज्ञात व्यक्ती दबा धरून बसलेले दिसले.
यावेळी पोलिसांनी सदर वाहनाजवळ जाउन चौकशी करण्याकरिता जात असताना अचानक पणे अंधारामध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी फोर्चुनर वाहनात बसुन त्यांची फोर्चुनर गाडी आंधळगाव फाटा येथुन भरधाव वेगाने चौफुल्याच्या दिशेने पळवली. यावेळी पोलिसांनी तत्काळ नियंञण कक्षास माहिती देत जिल्हयामध्ये नाकाबंदी लावण्यात आली.त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब जगताप व चालक यांनी पारगाव कडील बाजुने फॉर्चुनर गाडीचा न्हावरा ते पारगाव रोडने पाठलाग करून पारगाव चैफुला येथे फोर्चुनर वाहनास खाजगी वाहन व सरकारी वाहन आडवे लावली.
यावेळी गाडीतील आरोपी यांनी गाडी जागेवरच सोडुन शेतामधुन पळ काढला.त्यावेळी पोलिसांनी चपळाई करुन पाठलाग केला. त्यामध्ये संशयीत व्यक्ती पळत असताना खाली पडले त्यातील दोघाना जमिनीचा मार लागला व उठुन ते पुन्हा पळु लागले. त्याचवेळी पोलीसांनी आरोपींन ताब्यात घेणेसाठी सौम्य बलप्रयोग केला. त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले.त्यावेळी पळुन जाण्या-या तीन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले व दोन आरोपी अंधाराचा फायदा घेवुन शेतातुन पळुन गेले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे भाउसाहेब उर्फ आण्णा मधुकर फडके (३२, रा.कानगाव ता दौड जि पुणे),अनिल हनुमंत चव्हाण (१९, रा कानगाव ता.दौड) अशी नावे असुन व तिसरा अल्पवयीन आरोपी आहे. यावेळी आरोपींकडुन फोर्चुनर वाहन, पिस्टल सारखे दिसणारी छ-याची गण, फायटर, एक तलवार, रस्सी, दोन लाकडी दांडगे, ३ मोबाईल,गाडीचे नंबर प्लेट अशी घातक साहित्य मिळुन आले आहेत.
या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आला असुन या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे हे करीत आहेत.