सोलापूर : सोलापुरातील विडी कारखाने सुरू करा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महापालिकेच्या गेटमध्ये शेकडो विडीकामगार महिलांनी ठिय्या दिला.
मागील आठ दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन कारखाने सुरू करण्याची मागणी केली त्यावेळी पालकमंत्र्यांनी 1 जून ला सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार कारखाने करण्यात यावे यामागणीसाठी आज शेकडो विडी कामगार महिलांनी महापालिका गेटमध्ये ठिय्या देत आंदोलन सुरू केले.कोरोनाचा वाढता प्रकोप विचारात घेऊन आंदोलन कर्त्या विडी कामगार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.