‘व्हॉइट कॉलर’ जुगार अड्यावर पोलिसांचा छापा; 26 ताब्यात

0

पुणे : भिगवण येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी राजकीय पदाधिकारी, शासकीय नोकरदार यांच्यासह नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबोडी रस्त्यावर छापा टाकला. त्यावेळी 8 टेबलांवर खेळवल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर 1 लाख 12 हजार 780 रुपयांची रकमेसह 3 लाख 12 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने जुगार अड्ड्याची जागा सतत बदलण्यात येत होती. निंबोडी रस्त्यावर असलेल्या डोंगराजवळ जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रिमझिम पाऊस सुरु असताना फिल्मी स्टाईलने या ठिकाणी प्रवेश केला. पोलिसांचा छापा पडल्याचे समजताच जुगाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधीच दिली नाही.

भिगवण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांबरोबर शासकीय कर्मचारी , ग्रामपंचायत सदस्य, बारामती परिसरातील मान्यवर आहेत. पोलिसांनी केलेल्या करावाईमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा 6 तालुक्यातील नामांकित लोकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण 26 जणांना ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.