अमरावती : पोलीस उपनिरीक्षक आत्महत्येचं गूढ वाढले आहे. आत्महत्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 ऑगस्टला समोर आली होती.
या प्रकरणात आता ऑडिओ क्लिप समोर आली आहे. सदर ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मृतक पीएसआय अनिल मुळे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. ऑडिओ क्लिपनुसार, अनिल मुळे यांचे पुणे सीआयडी विभागात प्रमोशन झाले होते.
मात्र, पोलीस ठाण्यात ६ महिन्यापासून जॉइन करून घेत नसल्याने पीएसआय अनिल मुळे होते तणावात असल्याचं दिसत आहे. अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू अनिल मुळे यांच्या भावाने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजते. मात्र पोलीस विभाग याबाबतीत गुप्तता पाळत आहेत. पीएसआय अनिल मुळे यांचे आपल्या मित्रासोबतच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.