पूजा चव्हाण प्रकरणातील राठोड गावात परतला; मात्र…

0

बीड : टिक टॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव पुढे आलेल्या अरूण राठोड हा परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील घरी कुटुंबासह परतला आहे. मात्र रविवारी रात्री चोरट्यांनी त्याच्या घरात चोरी करुन सोन्याचे दागिने आणि रक्कम लांबविली गेली आहे.

परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे सुभाष राठोड यांच्या घरात चोरीची घटना घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुण राठोडचे कुटुंबीय घरी आले तेव्हा घरातील कपाटातील सामान इतस्त: पसलेले  होते.

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे, पोलीस नाई रामचंद्र केकान, चंद्रकांत आंबाड बीडचे ठसे तज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण त्यांचे कर्मचारी यांनी भेट दिली आहे. सुभाष राठोड हे अरुण राठोड यांचे वडील आहे.

पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडचा आवाज नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.