पंतप्रधान बोरिस जाॅनसन यांनी केली लाॅकडाऊनची घोषणा
इंग्लंडमध्ये करोनाच्या नव्या प्रजातीचे थैमान : जग पुन्हा लाॅकडाऊनच्या छायेत जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : करोनाच्या नव्या प्रजातीने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. जाॅनसन यांनी सांगितले की, “हे लॉकडाउन बहुदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लागू होईल जेणेकरुन वेगाने पसरणाऱ्या करोनाच्या नव्या विषाणू प्रसार थांबू शकेल.”
या घोषणेमुळे पुन्हा बुधवारपासून सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. स्कॉटलंडच्या घोषणेनंतर इंग्लंडने ही लाॅकडाऊनची घोषणा केली आहे, असे समोर आले आहे. ब्रिटनमधील करोना विषाणुमुळे ४४ दशलक्ष लोकांवर अगोदरच या कडक नियमांना समोर जात आहेत. जाॅनसन म्हणाले की, “या करोनाच्या नव्या विषाणुमुळे सुमारे २७ हजार लोकांना रुग्णालयात दाखल केले होते. जे मागील वर्षी एप्रिल महिन्यात करोनाने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या ४० टक्के प्रमाण जास्त आहे. मंगळवारी फक्त २४ तासांत ८० हजारांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहेत.
“इंग्लंडमधील बहुतेक भागांमध्ये यापूर्वीच कडक निर्बंध सुरू केलेले आहेत. यावरून एक सिद्ध झाले आहे की, पूर्वीच्या करोनापेक्षा या नव्या प्रजातीचच्या करोनावर मात करण्यासाठी आपल्याला आणखी कष्ट उपसण्याची गरज आहे. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत लाॅकडाऊन घोषीत करण्याात आला होता.