आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

0

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी अपशब्द उच्चारणाऱ्या आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महिलांनी क्रांती चौकात शिरसाठ यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध आंदोलन केले. क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिंदे शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी 26 मार्च रोजी कार्यकर्त्याच्या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अश्लील भाषेत टीका केली होती. त्यामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका होत आहे. याच्या निषेधार्थ 28 मार्च रोजी क्रांती चौकात विरोधी पक्षनेते दानवे व महिला शिवसैनिकांच्या वतीने हातात काळे ध्वज घेऊन व संजय शिरसाठ यांचे चित्र असलेल्या बॅनरवर काळी फुले मारून जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

शिरसाठ यांचे वक्तव्य घृणास्पद असून पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिला पदाधिकारी यांनी केली. तर दानवे यांनी शिरसाठ यांचे वक्तव्य निषेधार्थ असल्याचे म्हटले आहे. या विरोधात क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.