भाजपला धक्का; भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0

मुंबई : एकिकडे विधान परिषद निवडणूकीमुळे राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे राजकीय भूंकपाच्या घटना देखील होताना दिसत आहेत. ऐन विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. उस्मानाबाद येथील भाजपचे नेते दिग्विजय शिंदे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.

दिग्विजय शिंदे यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ”दिग्विजय शिंदे यांनी गेली अनेक वर्षे भाजपात काम केलं. आलेल्या अनुभवानंतर ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. वडिलांपासून फारकत घेऊन दिग्विजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा धाडसी निर्णय घेतला,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, मित्र पक्षांकडून कोणी येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो. पण भाजपकडून येत असेल तर Express way मोकळा आहे,’ असं देखील जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “दिग्विजय शिंदेंसोबत अनेक सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. इतके वर्ष एका पक्षात काम करणे आणि अचानक भूमिका बदलून पक्ष बदलणे हे एक आव्हान आहे. तरी वडील भाजपमध्ये असताना त्यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याचं ठरवलं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो,”
तसेच, ‘शरद पवार यांच्यासोबत काम करणारे लोक आम्हाला सोडून गेले. काही वैचारिक मतभेद त्यांचे असतील मात्र आता ते जरी सोडून गेले तरी त्या ठिकाणचा विकास आपल्याला करायचा आहे.”

पुढे अजित पवार म्हणाले, “तीन पक्षाच सरकार म्हटल्यावर काही नाराजी असते पण सरकार चाललं पाहिजे आमदारांची नाराजी नसू नये त्यात विकास कामासाठी एकत्रितपणे निर्णय सरकार म्हणून घेतले जातात. प्रत्येक पक्ष त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय,” असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.