टोकियो : पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधू हिचापराभव झाला होता. चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून सिंधू हिला धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे.
दोघीमध्ये पहिल्या गेममध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाल्यानंतर ताय झूनं दुसऱ्या गेममध्ये तुफान खेळ केला. तैपेईची खेळामुळे सिंधूकडून चुंकामागून चुका होत गेल्या. उपांत्य फेरीतील पराभवानंतर सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद झाली होती.,