रक्षकच झाले भक्षक; पोलीस अधिकाऱ्याचे पातळीहीन कृत्य

0

नागपूर : पोलीस अधिकाऱ्याने पातळीहीन कृत्य केले।असून पोलीस खात्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे. तीन महिला होमगार्डने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध अश्लीलचाळे केल्याची तक्रार दिली आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्याविरुद्ध तीन महिला होमगार्ड नी अश्लीलचाळे केल्याची तक्रार पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या सर्व घटनेची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी मेश्राम यांना निलंबित केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी १२ जूनला केबिनमध्ये बोलावून २४ वर्षीय महिला होमगार्डला महागडे गिफ्ट घेऊन देण्याचे आमिष दाखवत अश्लील चाळे केले.

त्याचबरोबर अन्य दोन महिला होमगार्डशीही मेश्राम यांनी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यानंतर या तिन्ही होमगार्ड महिलांनी याची तक्रार पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्याकडे गुरुवारी केली. निलोत्पल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर मध्यरात्री २ वाजन्याच्या सुमारास मेश्राम यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी विशाखा समितीच्या अध्यक्षा पोलीस उपायुक्त विनीता शाहू या करीत आहेत. दरम्यान, सरकारी पिस्तूल व वर्दी पोलीस मुख्यालयात जमा करून मेश्राम यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.