अमेरिका : अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक लोक जखमीही झाले आहेत.
Multiple fatalities in shooting at US Walmart store: AFP News Agency
— ANI (@ANI) November 23, 2022
चेसापीक पोलिस विभागाचे म्हणणे आहे की सुमारे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. पोलीस इमारतीची चौकशी करत आहेत. गोळीबार करणारा मृत झाल्याचा पोलिसांना विश्वास आहे, परंतु लोकांना सध्या इमारतीपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री 10:12 वाजता गोळीबाराची माहिती देणारा कॉल आला.
वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर प्रचंड पोलीस दल अजूनही तैनात आहे, असे मीडिया आउटलेट WAVY च्या मिशेल वुल्फ यांनी सांगितले. यासोबतच 40 हून अधिक आपत्कालीन वाहनांनाही इमारतीबाहेर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाने स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे.
डेलीमेल डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले. व्यवस्थापक ब्रेक रूममध्ये घुसला आणि दुकानातील इतर कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला.
अमेरिकेतील सामूहिक गोळीबाराच्या घटना सुरुच आहे. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबाराच्या बातम्या येत असतात. फक्त दोन दिवसांपूर्वी, कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये एका गे नाईट क्लबमध्ये एका बंदुकधारीने गोळीबार केला, ज्यात किमान पाच लोक ठार आणि 18 जखमी झाले.