लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; नोकरीसाठी अडचण असल्याचे सांगून लाखो रुपये उकळले

0

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच तिच्याकडून लाखो रुपये घेऊन ते पैसे परत न करता तिची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार सन 2018 ते सन 2021 या कालावधीत घडला.

युवराज आनंदराव पाटील (27, रा. रेंदाळ, हातकणंगले, जि. कोल्हापुर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कोल्हापूर मधील शिरोळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिथून हा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीला बागा बीच गोवा येथील लॉजवर ट्रॅव्हल्सने घेऊन जात तसेच एक्सर्बिया हिंजवडी येथे फ्लॅटवर एकत्र राहून आणि महाबळेश्वर येथे स्वतःच्या कारमधून घेऊन जात तिथल्या लॉजवर आरोपीने फिर्यादीवर बलात्कार केला.

आरोपीने त्याच्या कंपनीत प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगून सरकारी नोकरीसाठी पैसे पाहिजे असे कारण देत फिर्यादीकडून 11 लाख 65 हजार 657 रुपये घेतले. फिर्यादीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्यातील एक लाख 59 हजार रुपये आरोपीने परत केले, अन्य पैशांची मागणी केली असता आरोपीने फिर्यादींसोबत केलेल्या कृत्याची माहिती तिच्या होणा-या नवऱ्याला सांगून तिचे जमलेले लग्न मोडण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.