बडोदा : लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली असून याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. पार्टीत दारुच्या नशेत शुद्ध हरपल्याने मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. बदनामीला घाबरुन तिने आत्महत्या केली आहे.
तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना एका खासगी कंपनीत नोकरीदेखील करत होती. एक दिवस तिने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांसाठी तिच्या घरी ओली पार्टी ठेवली होती. दारुच्या नशेत शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. या धक्कात तिने आत्महत्या केली. घटना गुजरातच्या बडोद्याची आहे. दिशांत कहार आणि नाझिम इस्माईल रहीम मिर्झा अशी त्या मित्रांची नावे आहेत.
तरुणीने तिच्या या मित्रांसोबत खूप दारु घेतली आणि ती बेहोश झाली. या तिच्या परिस्थितीचा फायद घेऊन दिशांतने तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा दुसऱा दिवस उजाडला तेव्हा तिला शुद्ध आली. तेव्हा तिला आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचा अंदाज आला. तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले.
तिने लगेचच तिच्या एका जवळच्या मैत्रिणीशी संपर्क केला. तिला घडलेली घटना सांगितली. त्या मैत्रिणीने पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्या तरुणीने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे.