गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

डिसेंबर पासून 200 रुपयांने वाढ

0

नवी दिल्ली : सामान्यांच्या आर्थिक नियोजनात गडबड होण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत 794 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

हे नवीन दर 25 फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सामान्यांना आणखी फटका सहन करावा लागणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

1 डिसेंबरपासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या बजेटवर नक्कीच परिणाम होत आहे. दर 594 रुपयांवरून आज 794 रुपये प्रति सिलेंडर झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.