नाशिक : नाशिकमधील सिडको भागातील उपेंद्रनगर परिसरात ‘आरपीआय’च्या एका कार्यकर्त्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही गोळीबाराची घटना उपेंद्रनगर येथे मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली.
सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे उपेंद्रनगर येथे असताना दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी प्रशांत जाधव यांच्या दिशेने २ राऊंड फायर केले. त्यात त्यांच्या मांडीला एक गोळी लागली.
दुसरी गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेतच प्रशांत जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.