फोर्ब्जच्या यादीत रियान अव्वल

९ वर्षांच्या रियानने युट्यूबवर कमवले २९.५ मिलीयन डाॅलर 

0

फोर्ब्ज मॅगेजिनच्या बातमीनुसार ९ वर्षाच्या रियान काजी युट्यूबवर सर्वात जास्त कमाई करणारा कंटेन्ट क्रिएटर ठरलेला आहे. रियान काजीने २०२० मधील आपल्या युट्यूब चॅनलवरून २९.५ मिलिनय डाॅलर कमाई केलेली आहे. युट्यूबवर सर्वात जास्त कमाई करणारा कंटेन्ट क्रिएटर म्हणून या ९ वर्षांच्या लहान मुलाची नोंद झाली आहे.

रियान काजी ‘रियान वर्ल्ड’ नावाने युट्यूब चॅनेल चालवतो. रियान काजीचे रेयान गुआन हे खरे नाव आहे. २०१५ मध्ये त्याने युट्यूब चॅनेल सुरू केले होते. त्यावेळी तो फक्त ४ वर्षांचा होता. रियान चॅनेलवरून विज्ञानासंबंधी वेगवेगळे प्रयोग करत असतो.
रियान आपल्या युट्यूब चॅनेलवर विज्ञानाशिवाय सबस्क्रायबरच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचा कंटेन्टसुद्धा टाकत असतो. २०१५ साली रियानच्या आई-वडिलांनी त्याला युट्यूब चॅनेल सुरू करून दिले होते. मागील ५ वर्षांत २७.७ मिलियन सबस्कायबर आहेत.
रियान सध्या इयत्ता तिसरीमध्ये शिकतो आहे. रियान आपल्या आई-वडिलांची मदत घेऊन ९ युट्यूब चालवतो आहे. त्यांच्या एका-एका व्हिडीओला १०० कोटी व्ह्यूज असतात. मागील तीन वर्षांत युट्यूबवर सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकाॅर्ड रियानने केला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.