मुंबई : शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे, अशी जहरी टीका माजी मंत्री तथा रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुतण्यापासून मला वाचवा अशी नवीन हाक आता महाराष्ट्रला ऐकू येत आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती” असे सदाभाऊ खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, 80 च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ 50 वर्ष या राज्यामध्ये राहिला. शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, हा सैतान पुन्हा गावगाड्यात येऊ नये आणि पुन्हा नवे सरदार बनवू नये. यासाठी लढाई लढावी लागेल. शरद पवार यांच्या कालखंडात सरंजामशाही, 50 वर्ष महाराष्ट्रात अंमल होता, देवेंद्र फडणवीस यांनी गवताचा भारा विस्कटला, आता गवताच्या कांडया तुटून पडतील. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘सैतान’ असा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.