साक्री नगरपंचायत : निकालानंतर दोन गटात राडा; भावाच्या मदतीला गेलेल्या बहिणीचा मृत्यू

0

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाला गालबोट लागले आहे. निकालानंतर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्या हाणामारीमध्ये भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, भावालादेखील जबर मारहाण झाल्याने तेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे साक्री तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीचा जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची ३५ वर्षांची सत्ता हिसकावून घेतली आहे. याठिकाणी भाजपने सत्ता मिळविली असून या शिवसेना नेते नाना नांगरे यांना जनतेने धक्का दिला आहे. या नगरपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसलाही दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

साक्री नगरपंचायतीत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या नाना नागरे यांनाही निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. केवळ चार जागा शिवसेनेला जिंकता आलेल्या आहेत. भाजपने मात्र ११ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा नगरपंचायतीवर फडकवला आहे. साक्री नगरपंचायतीत भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने ४, काँग्रेस पक्षाने १ आणि अपक्षाने एक जागा जिंकली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.