तमिळनाडू येथील गंभीर गुन्ह्यात फरार असणारे सराईत वाकड पोलिसांच्या जाळ्यात

0

पिंपरी : तामिळनाडूमध्ये टोळी युद्ध करून विविध गुन्हे दाखल झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात पळून आलेल्या टोळक्याने एकातरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

मंदार सुनिल कुसे (वय 25, गिरगाव, मुंबई) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अरुमुगम सुब्बयाह (25, रा. थेरगाव पुणे. मूळ रा. मलुकारकुरीची, तिरुनलवेली, तामिळनाडू), शंकर अरुनाचलम (25, रा. तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू), रमेश अरुनाचलम (28, रा. तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू), वानमामलाई मुथ्थया (19, रा. तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू), इसकीपांडी सुब्बलह (22, रा. तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू), मायाकन्नन सुब्रमणी, (20, रा. तिरुनेलवेल्ली, तामिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार कुसे हे त्यांच्या मित्राच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने अस्थिविसर्जनासाठी काळेवाडी येथे आले होते. मंदार यांचा मित्र संघर्ष चंदनशिवे यांच्या वडिलांना दक्षिण भारतीय मुलाने किरकोळकारणांवरुन धक्काबुक्की केली होती. 24 मे रोजी रात्री त्याचा जाब संघर्ष चंदनशिवे यांनी संबंधित व्यक्तींना विचारला होता. त्यावेळीमंदार कुसे हे देखील चंदनशिवे यांच्यासोबत होते.

25 मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास मंदार हे काळेवाडी (Wakad) येथील एका हॉटेल मधून जेवणाची पार्सल ऑर्डरघेत असताना पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये मंदार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठीरुग्णालयात दाखल करण्यात आले. चंदनशिवे याने जाब विचारल्याच्या रागातून आरोपींनी हा हल्ला केला असल्याचे तपासात समोरआले आहे.

अरुमुगम सुब्बयाह याला पोलिसांनी थेरगाव मधून अटक केली. त्यावेळी त्याच्या ताब्यात दोन किलो 25 ग्रॅम गांजा आढळून आला. याबाबत त्याच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा केल्यानंतर अन्य आरोपी औंध येथे जाऊन लपून बसलेअसल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी औंध येथून अन्य पाच जणांना अटक केली.

अटक केलेल्या सहा जणांपैकी चार आरोपींवर तामिळनाडू येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शंकर याच्यावर 16 गुन्हे, तर वानमामलाईयाच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. इसकीपांडी याच्यावर पंधरा गुन्हे, तर अरुण याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे मूळ गावातदोन गटात वैमानस्य आहे त्यातून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. वैमनस्यामध्ये संरक्षण मिळण्यासाठी आरोपी पुणे येथेराहून इडली डोसा विक्रीचा व्यवसाय करत होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेशजवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, राजेश मासाळ, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार बंदु गिरे, संतोष बर्गे, स्वप्निल खेतले, अतिशजाधव, प्रमोद कदम, संतोष महाजन, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, अजय फल्ले, तात्या शिंदे, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, कीर्तेय खराडे, भास्कर भारती, पोलीस शिपाई पंडीत यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.