साताऱ्याचा सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांच्या जाळ्यात

0

पुणे : कमरेला पिस्तुल लावून उभ्या असलेल्या सातारा शहरातील सराईत गुन्हेगाराला पुण्यातील समर्थ पोलिसांनी अटक केली. आकाश भगवान त्रीभुवन (२५, रा.बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना बारणे रस्ता येथे एकजण कमरेला पिस्तूल लावून उभा असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांच्या पथकाने कारवाई करत आकाशला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेला ३० हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व काडतुस आढळले आहे. याप्रकरणी त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात आर्म्स अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द सातारा जिल्ह्यात ४ गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, संतोष काळे, हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, शुभम देसाई, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सचिन पवार, नीलेश साबळे, सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.