केवळ टीआरपी नसल्यामुळे ‘सावित्री ज्योती’ मालिका बंद

0

मुंबई ः केवळ टीआरपीमुळे ‘सावित्री ज्योती’ ही मालिका बंद पडत आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेली मालिका बंद पडत असल्यामुळे  निर्माते महेश टिळेकर यांनी खंत व्यक्त केली आहे.

 ”फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?”, अशी खंत प्रसिद्ध निर्माते महेश टिळेकर यांनी बोलून दाखवली आहे.

केवळ प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही मालिका बंद करावी लागणार असं समजल्यावर ओमकार गोवर्धन आणि अश्विनी कासार यांना किती वाईट वाटत असेल. मालिकेत संपूर्ण जीव ओतून काम करूनही टीआरपीच्या स्पर्धेत ही मालिका यशस्वी झाली नाही, याला जबाबदार काळानुसार प्रेक्षकांची बदलत चाललेली आवड आहे की आणखी काही वेगळं कारण आहे, यावर विचार करायाला हवा, असे मत टिळेकर यांनी मांडले.
”सासू सुनांची भाडणं, येता-जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा आणि नवऱ्याची लफडी, असलं सगळं बटबटीत पाहायची सवय झाली आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कशाला म्हणायचा असा प्रश्न पडतो. पैशांत सुख मानणारे आणि पाहाणारे हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय मानणारे कलाकार आहे. परिस्थितीमुळे बऱ्याचदा तसं करणं भाग पडतं”, असे सडेतोड मत महेश टिळेकर यांनी मांडले.
Leave A Reply

Your email address will not be published.