वाॅशिंग्टन : अमेरिकन काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली.
पहाचे चार वाजता ही घटना घडली आहे. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कॅपिटाॅल इमारतीभोरती सुरक्षाव्यवस्था सुरळीत केली आहे. जो बायडन यांना नवनिर्वाचित राष्ट्राध्याक्ष पदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काॅंग्रेसची बैठक सुरू होती. त्यामध्ये जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्राध्यपच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला म्हणून त्यांच्या समर्थकांनी वाॅशिंग्टनमधील कॅपिटाॅल इमारतीत घुसून तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यूही झाला आहे. दरम्यान “कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे”, अशा आशयाचे जो बायडन यांनी ट्विट केले होते.