ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रथामिक कल पहा

0

मुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल, रविवारी मतदान पार पडले.  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान  झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह पहिल्यांदाच थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने १०० हुन अधिक जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीनेही ५८ जागा जिंकल्या आहेत. या निकालात काँग्रेस तिसऱ्या स्थानावर असून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये मोठी लढत होताना दिसत आहे.

राज्यातील ६०८ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ६०८ ग्रामपंचायतींपैकी ५१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत २७६ जागांचे  निकाल हाती आले आहेत. त्यानुसार भाजप आणि शिंदे गटाने १२७ जागांवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीने आतापर्यंत ९८ जागांवर बाजी मारली आहे. पक्षानिहाय विचार केला तर, भाजपने १०४ जागा जिंकल्या आहे. तर शिंदे गटाने २४ जागा जिंकल्या आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ६० जागा जिंकल्या आहे. तर काँग्रेस २३ आणि शिवसेना १७ जागा जिंकल्या आहे. इतर अपक्षांनी ४८ जागा जिंकल्या आहेत. अजूनही मतमोजणी सुरू आहे.

दरम्यान,अमरावती जिल्ह्यात ५ पैकी ३ सरपंचपदं काँग्रेसने पटकावली आहे. तर भाजपच्या वाटेला एकच जागा आली आहे. यामध्ये  तिवसा तालुक्यात माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे, घोटा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या रुपाली राऊत आणि कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी या विजयी झाल्या आहेत. तिवसामध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेसने बाजी मारली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.