मुंबई : अमरावती शहरातून हवालामार्फतआलेली साडेतीन कोटी रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातून हवालामार्फत साडेतीन कोटी रुपयांची वाहतूक होत असल्याच्या माहिती पोलिसांनी मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन स्कॉर्पियो ताब्यात घेतल्या. या वाहनामध्ये साडेतीन कोटी रुपयांची रक्कम पोलिसांना आढळून आली.
शहरातील फरशी स्टॉप परिसरात नाकाबंदी करत पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यातील दोघे जण हे अमरावतीमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,
पोलिसांनी जप्त केलेल्या स्कॉर्पिओमध्ये पैसे ठेवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची जागा तयार करण्यात आल्याचं दिसून आलं.
ही रक्कम मोजण्यासाठी दोन स्वयंचलित यंत्र कार्यान्वित करण्यात आले होते. यासंदर्भात ट्रेझरी व इन्कम टॅक्स विभागाला माहिती देण्यात आली असून, पोलीस आयुक्त आरती सिंह व डीसीपी सातव यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.
दोन्ही स्कॉर्पिओ गाड्यांच्या मधल्या सीटच्या खाली पैसे ठेवण्यासाठी विशिष्ट जागा तयार करण्यात आली होती, लोखंडाचा जाड पत्रा व नट बोल्ट याचा उपयोग करून ही यंत्रणा तयार करण्यात आली होती. वरवर पाहता कुणालाही शंका येणार नाही अशी व्यवस्था या दोन्ही स्कॉर्पिओमध्ये करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.