सेक्स रॅकेट ! दिल्ली-मुंबईतील तरुणींची सुटका

0

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. वेश्याव्यवसाय कराणा-या दलाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी दिल्ली आणि मुंबईतील 2 मुलींची सुटका केली. प्रीतम कृष्णा दहीकर (43) असे आरोपीचे नाव असून राज उर्फ राजेश इखान आणि समीर उर्फ किशोर शेट्टे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी व इतर दोन साथीदार फरार झाले.

याबाबत माहिती अशी की, हॉटेल ब्रिज इन येथे महिनेवारीने रूम भाड्याने घेऊन दिल्ली, मुंबई आणि कोलकत्ता येथील तरुणीना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात होत्या. याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींसोबत संवाद साधला आरोपींनी 2 मुलींचा 9 हजार रुपये सौदा पक्का केला. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल ब्रिज ईन येथे धाड घातली.

दरम्यान, येथे मुलींची डिलिव्हरी देताच पोलिसांनी प्रीतमला पकडले. यावेळी दिल्ली, मुंबईतील तरुणी सापडल्या आहेत. पैशाच्या लालसेपोटी दोघीही वेश्याव्यवसाय करतात. असं तपासात माहिती समोर आली. सदरची कारवाई उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय ललिता तोडासे, एपीआय संतोष जाधव, हवालदार अनिल अंबाडे,
कॉन्स्टेबल संदीप चंगोले, राशीद शेख, भूषण झाडे, चेतन गेडाम, लक्ष्मण चौरे, मनीष रामटेके, प्रतिमा मेश्राम यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.